मुलींच्या जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेत उपांत्य फेरीत पोदार स्कूलचा विजय

Children playing football

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिका व जिल्हा क्रीडा परिषद यांच्या वतीने संत तुकारामनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुलात आयोजित जिल्हास्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेत 17 वर्षाखालील मुलींच्या गटात पिंपरीतील पोदार इंटरनॅशनल स्कुलच्या संघाने निगडीतील न्यु पब्लिक स्कुल संघावर 3-0 अशा फरकाने विजय मिळवला. या सामन्यात सायली जाधवने 2 गोल केले तर आस्था मोरे हिने 1 गोल केला. 17 वर्षाखालील मुलींच्या उपांत्य फेरीत पी. सी. एम. सी. माध्यमिक विद्यालयाने टाटा मोटर्स पिंपरी संघावर 2-0 या फरकाने विजय मिळवला. या सामन्यात सानिया शेख-1 तर निशा पारसे-1 असे गोल केले. 19 वर्षाखालील मुलींच्या प्रथम फेरीत एस. एन.बी. पी. स्कुल संघाने क्रिएटीव्ह पब्लिक स्कुल ऍण्ड ज्युनियर कॉलेजवर 1-0 अशा फरकाने विजय मिळवला. या सामन्यात रेणुका बडदे हिने 1 गोल केला. तर 19 वर्षाखालील मुलींच्या उपांत्य फेरीत एस. एन. बी. पी. स्कुल ऍण्ड ज्युनिअर कॉलेज चिंचवडच्या कमल नयन बजाज स्कुलवर टाय ब्रेकरमध्ये 2-0 अशा फरकाने विजय मिळवला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)