मुलाची गळफास घेऊन आत्महत्या

पारनेर –आई-वडील रागावल्याच्या कारणावरून खडकवाडी येथील 17 वर्षीय मुलाने राहत्या घराच्या छताला दोरीच्या सहायाने गळफास घेवून स्वत:ची जीवनयात्रा संपविली. याबाबतची खबर मयताचे मेहुणे सागर संजय शिंगोटे यांनी टाकळी ढोकेश्‍वर पोलिसांत दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शुक्रवारी (दि.29) रोजी खडकवाडी येथे सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास शिवराज गागरे (वय-17 वर्षे), (रा. खडकवाडी, ता. पारनेर) याने राहत्या घराच्या छताला दोरीच्या सहायाने गळफास घेवून आत्महत्या केली. तरूण टाकळी ढोकेश्‍वर येथील श्री ढोकेश्‍वर ज्युनिअर कॉलेजमध्ये 11 वी शास्त्र शाखेमध्ये शिक्षण घेत होता. दरम्यान आईवडील दैनंदिन काम करण्यासाठी 100 मीटर अंतरावरील शेतात कडब्याची गंजी रचण्यासाठी गेले असता, त्याने राहत्या घराला आतून कडी लावून छताला दोरीच्या सहायाने गळफास घेवून आत्महत्या केली.

दरम्यान विवाहीत बहीण घरी आली असता, घराला आतून कडी लावलेली दिसल्याने आवाज दिला, मात्र आतून कुठलाही प्रतिसाद न आल्याने आरडाओरडा केला. त्यानंतर दरवाजा तोडला असता, घराच्या छताला शिवराज गागरे लटकलेला दिसला. शिवराज हा आई-वडीलांना एकुलता एक मुलगा असून, दोन विवाहित मुली आहेत.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.