मुलांना भेटण्यासाठी भूमि पेडणेकर चंबलला

“दम लगाकर हइशा’, “शुभ मंगल सावधान’ आणि “टॉयलेट – एक प्रेमकथा’ यासारख्या चित्रपटातून आपल्या अभिनयातून प्रेक्षकांची मने जिंकत भूमि पेडणेकर हिने बॉलिवूडमध्ये आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. आता ती पुन्हा एकदा नवीन भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. “सोन चिरैया’ या आगामी चित्रपटात ती चंबलमधील एका डाकूची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाचे सर्व शूटिंग चंबल येथेच करण्यात येत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान भूमि तेथील स्थानिक नागरिक आणि मुलांमध्ये खूपच रमली होती. त्यामुळे सुटीचे काही दिवस त्यांच्यासोबत घालविण्याचे तिने ठरविले होते. त्याप्रमाणे खास मुलांना भेटण्यासाठी ती मुंबईवरून चंबलला गेली. तेथील अभ्युदय अनाथालयाला भेट देउन तिने अनाथालयातील मुलांना खास भेटवस्तूही दिल्या. तसेच मुलांसोबत मस्ती केली. भूमि पेडणेकरने दिलेल्या या अचानक भेटीमुळे मुले देखील खुप आनंदी झाले.

दरम्यान, या चित्रपटाबाबत भूमि खूपच उत्साहित आहे. या चित्रपटात ती 1970च्या दशकातील एका महिला डाकूची भूमिका साकारत आहे. “सोन चिरैया’त भूमिसोबत अभिनेता सुशांत सिंह राजपूतही मुख्य भूमिका साकारत असून त्याने नुकतेच चित्रिकरण पूर्ण केले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक चौबे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)