मुलनाथेश्‍वरास श्रावणी सोमवार निमित्त रुद्राक्षाची अलंकार पूजा

श्री उत्तर चिदंबरम नटराज मंदिरात
जन्माष्टमीनिमित्त बाल राधा कृष्ण वेशभूषा स्पर्धेचे आयोजन
सातारा – पुणे- बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाजवळ असणाऱ्या श्री उत्तर चिदंबरम नटराज मंदिरात श्रावण महिन्यात विविध धार्मिक कार्यक्रम व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सध्या सुरु असलेंल्या श्रावण महिन्यानिमित्त दि.9 सप्टेंबर 2018 पर्यंत मंदिरात विशेष मंडपात उभारण्यात आलेल्या साडे चार फुट उंच अशा महाकाय शिवपींडीच्या दर्शनाचा लाभ भाविकांना घेता येणार आहे. ही शिवपिंड पहाण्यासाठी सध्या मंदिरात गर्दी होत आहे. दरम्यान तिसऱ्या श्रावण सोमवार निमित्त मंदिरातील मुलनाथेश्‍वरास वेदमूतीं विष्णू गुरुजी यांनी शेकडो रुद्राक्षाच्या सहाय्याने रुद्राक्ष अलंकार पुजा बांधली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या शिवपिंडीला भाविकांना अभिषेक घालण्याची सुविधा करण्यात आली असून या विशेष पुजेसाठी रुपये 501 देणगीमूल्य घेतले जात आहे. या पुजेनंतर भाविकांना रुद्राक्ष तसेच महाप्रसाद मंदिराकडून मिळणार आहे. दरम्यान गुरुवार दि. 30 ऑगस्ट रोजी सकाळी साडेसहा ते साडेसात या वेळेत संकष्टी चतुर्थी निमित्त गणहोम होवून रात्री 9.30 मिनिटांनी चंद्रोदय झाल्यानंतर महाप्रसाद आयोजित करण्यात आला आहे. मंदिरात रविवार, 2 सप्टेंबर रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव साजरा होताना देवास विशेष पुष्पअलंकार सजावट करण्यात येणार आहे. तसेच याच दिवशी नटराज मंदिर आणि नटराज महिला मंडळाच्यावतीने रविवारी सायंकाळी 4 ते 6 यावेळेत मंदिरात प्रथमच बाल राधा कृष्णाची वेशभूषा स्पर्धां आयोजित करण्यात आली आहे.

या स्पर्धेंसाठी दोन वयोगट असून पहिला वयोगट जन्मापासून ते 5 वर्षांपर्यंत आणि दुसरा वयोगट 6 वर्षे ते 12 वर्षापर्यंत रहाणार आहे. या स्पर्धेसाठी 250 रुपये प्रवेश फी असून प्रत्येक गटात 3 बक्षिसे काढण्यात येणार आहेत. प्रथम क्रमांकास 1 हजार रुपये, द्वितीय क्रमांकास 700 रुपये व तृतीय क्रमांकास 500 रुपये दिले जाणार आहेत. या स्पर्धेसाठी मंदिराचे व्यवस्थापक चंद्रन यांच्याकडे आधी नोंदणी आवश्‍यक असुन जन्माष्टमी दिवशी सकाळी आठपासून तुलाभार व सायंकाळी 6 ते 9.30 दरम्यान भगवद्‌गीता वाचन सोहळा संपन्न होणार आहे. सोमवार, दि.3 रोजी सकाळी 9 ते 12 या वेळेत श्री सत्यनारायण महापूजा व मूलनाथेश्‍वरास लोण्याची अलंकार पुजा बांधली जाणार आहे. सोमवारी सायंकाळी 6 नंतर दहीहंडी सोहळा होणार आहे.

जन्माष्टमीनिमित्त मंदिरात प्रथमच मंदिरातील दास मारुतीस 1 सप्टेंबरला विशेष अभिषेक सायंकाळी 4 ते 5 या वेळेत घालण्यात येणार असून मंदिरातील श्री दास हनुमान मुर्तीस 21 डझन केळांची विशेष अलंकार सजावट पूजा केली जाणार आहे. दि.9 सप्टेंबर रोजी सकाळी 9 ते 12 या वेळेत श्री रुद्रेश्‍वरास रुद्राभिषेक केला जाणार आहे. वरील सर्व कार्यक्रमास ऐच्छिक देणगी मुल्य असून सातारा जिल्ह्यातील भाविकांनी या उप्रक्रमास सहभागी होवून पवित्र श्रावण मासातील धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिराच्या विश्‍वस्त समितीने केले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)