नुकसानग्रस्तांना लवकरच मदत मिळणार : गिरीश बापट

पुणे – सिंहगड रस्त्यावरील दांडेकर पुलाजवळ मुठा कालवा फुटल्याने लोकवस्तीमध्ये पाणी शिरले आहे. ज्या झोपडपट्यांमध्ये पाणी शिरले आहे. त्याभागात पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. नुकसानग्रस्तांना लवकरच मदत करण्यात येईल, असे आश्‍वासन पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिले आहे.

बापट म्हणाले, पाणी घरात शिरल्याने नागरिकांच्या घरातील साहित्याचे नुकसान झाले आहे. त्याचे पंचनामे करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. नुकसानग्रस्त नागरिकांना लवकरात लवकर मदत करण्यात येईल. कालवा दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करण्याचे आदेश पाटबंधारे विभागाला दिले आहे. सध्या पाऊस पडत असल्याने तसेच शेतीसाठी आर्वतन सुरू असल्याने तात्पुरती दुरुस्ती करून पाणी सोडण्यात येईल. त्यामुळे शेतीला पाणी देणे शक्‍य होणार आहे. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देणार नाही. कालव्यातून पाणी सोडणे बंद झाल्यानंतर कालव्याची दुरुस्तीचे काम पुन्हा हाती घेतले जाणार आहे. ही दुरुस्ती पक्‍क्‍या स्वरुपाची असणार आहे. कालवा फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. मात्र यामुळे कोणताही पाण्याचा प्रश्‍न निर्माण होणार नाही. यावर्षी पुण्यात पाऊस भरपूर झाला आहे. धरणे 100 टक्के भरली आहेत. त्यामुळे पाण्याची समस्या निर्माण होणार नाही, असे ही बापट यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)