मुझफ्फरपूर आश्रमगृह प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची शिफारस

पाटणा – मुझफ्फरपूरमधील महिला आश्रमगृहातील मुलींच्या लैंगिक शोषणाची चौकशी सीबीआयकडून करण्यात यावी, अशी शिफारस बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. ही घटना अतिशय निंदनीय आहे. या प्रकरणाशी संबंधित अफवा राज्यामध्ये पसरायला लागल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणाचा तपास सीबीआयकडून करण्याची शिफारस केली गेली आहे, असे राज्याचे पोलिस महासंचालक के.एस.द्विवेदी यांनी सांगितले.

आश्रमगृहातील 42 कैदी महिलांपैकी 29 जणींचे लैंगिक शोषण झाल्याचे वैद्यकीय तपासणीमध्ये निष्पन्न झाले होते. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या प्रकरणाचा सीबीआय तपास त्वरित सुरू करण्याची सूचना राज्याचे मुख्य सचिव, पोलिस महासंचालक आणि गृह विभागाच्या मुख्य सचिवांना दिल्या आहेत. बिहारमधील विरोधी पक्षांनीही या प्रकरणाचा तपास सीबीआयकडून करण्याची मागणी केली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी सत्तारुढ पक्षाशी जवळचे असल्यानेच राज्य सरकार हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोपही विरोधकांनी केला होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)