मुख्य सचिवांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश ; शिष्यवृत्तींचे प्रलंबित प्रकरणे तातडीने मार्गी लावा!

मुंबई: विविध संवर्गातील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तींचे प्रलंबित प्रकरणे तातडीने मार्गी लावावेत व वन हक्क दावे निकाली काढण्यासाठी विशेष मोहीम हाती घ्यावी, असे निर्देश मुख्य सचिव दिनेश कुमार जैन यांनी आज येथे दिले.

मंत्रालयात मुख्य सचिव दिनेश कुमार जैन यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडीओ कॉन्फरन्सिंग झाली. त्यावेळी ते बोलत होते. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्‍या जमाती, इतर मागासवर्ग, आर्थिक मागासवर्ग या संवर्गातील विद्यार्थ्यांना विविध योजनांच्या माध्यमातून त्यांच्या बॅंक खात्यात शिष्यवृत्तीची रक्कम थेट जमा केली जाते. त्यासंदर्भात मुख्य सचिवांनी विविध विभागांच्या शिष्यवृत्ती योजनांचा आढावा घेतला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ज्या जिल्ह्यांमध्ये प्रलंबित अर्जाचे प्रमाण जास्त आहे तेथील जिल्हाधिकारी व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे. शिष्यवृत्तीचे अर्ज विविध शैक्षणिक संस्थांच्या स्तरांवर प्रलंबित आहेत. तातडीने ते विभागाकडे मागवून घ्यावेत आणि लवकरात लवकर मार्गी लावावेत, असे निर्देश मुख्य सचिवांनी यावेळी दिले. प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी आपापल्या जिल्ह्यातील प्रलंबित अर्जांबाबत दररोज संध्याकाळी आढावा घेतला पाहिजे, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

वनमित्र मोहिमेअंतर्गत पालघर, नंदूरबार, ठाणे, धुळे, गोंदिया, जळगाव, चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली, नाशिक, औरंगाबाद आणि भंडारा या 12 जिल्ह्यातील वनहक्क दावे निकाली काढण्याकरिता जिल्हाधिकारी व जिल्हा वनसंरक्षकांनी विशेष मोहीम हाती घेवून फेब्रुवारी अखेरपर्यंत ते निकाली काढावेत, असे निर्देश मुख्य सचिवांनी यावेळी दिले.

यावेळी “बेटी बचाओ बेटी पढाओ’ या योजनेबरोबरच अंगणवाड्यांमध्ये दिल्या जाणाऱ्या सोयीसविधांचा तसेच विविध शिष्यवृत्ती लाभार्थ्यांच्या थेट बॅंक खात्यात जमा करणाऱ्या योजनाचा आढावा जैन यांनी घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)