मुख्यमंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

वरवंड- मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आपले प्राण गमवणारे काकासाहेब शिंदे यांच्या मृत्यूस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच जबाबदार असून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशा आशयाचे निवेदन दौंड तालुका संभांजी ब्रिगेडच्यावतीने दौंडचे तहसीलदार बालाजी सोमवंशी यांना देण्यात आले.
मराठा समाजाने आज तागायत शांततेच्या मार्गाने अंदोलन केले असून कोणत्याही शासकीय मालमत्तेचे नुकसान केले नव्हते. मात्र, सरकारने मराठा समाजाचा अंत पाहिला असून काकासाहेब शिंदे यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आणली. काकासाहेब शिंदे यांच्या मृत्यूस सर्वस्वी मुख्यमंत्री जबाबदार असून त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा तसेच त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, शिंदे यांच्या कुटुंबांला 50 लाखांची आर्थिक मदत करावी आणि त्यांच्या कुटंबातील एका व्यक्‍तीला कायमस्वरूपी शासकीय सेवेत घ्यावे, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे. यावेळी संभाजी ब्रिगेडचे दौंड तालुका अध्यक्ष सुनिल पासलकर, शहराध्यक्ष गणेश भोसले, कुलदिप गाढवे, अमोल पवार, निलेश खलाटे, संदिप पाचपुते, समिर काळे, विजय भोसले, मजहर शेख, दत्तात्रेय जठार आदींच्या या निवेदनावर सह्या आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)