मुख्यमंत्र्यांनी पाया पडून अण्णांकडून ९ महिन्यांची मुदत घेतली- जयंत पाटील

मुंबई: ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी निवडणूक होऊन जाईपर्यंत काही बोलू नये, म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पाया पडले आणि ९ महिन्यांची मुदत मागून घेतली, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. राष्ट्रवादीचे विधिमंडळ गटनेते अजित पवार यांच्यासोबत अमरावतीला रवाना होण्यापूर्वी जयंत पाटील नागपूर विमानतळावर पत्रकारांशी बोलत होते.

वंचित बहुजन आघाडीसंदर्भातही त्यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर, भारिप-बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी कितीही टीका केली, तरी भाजपा-शिवसेनेचा पराभव करण्यासाठी त्यांना महाआघाडीत घेण्याचे प्रयत्न करू, असे ते म्हणाले.

मुख्यमंत्री आणि अण्णा हजारे यांच्यात झालेल्या प्रदीर्घ सहा तासांच्या बैठकीनंतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आपलं उपोषण मागे घेतलं. आपल्या सर्व मागण्या मान्य झाल्याने उपोषण मागे घेत असल्याची घोषणा अण्णांनी केली आहे. अण्णा हे महाराष्ट्राची आणि देशाची संपत्ती असून त्यांनी आपलं उपोषण मागे घ्यावं असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आणि त्यानंतर अण्णांनी आपलं उपोषण मागे घेतलं.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)