मुंबई – चेंबूर भागात भिंत कोसळली

मुंबई – पुणे जिह्ल्यातील कोंढवा परिसरात  भिंत कोसळून १५ जणांचा मृत्यू झाल्याची घटना रात्री दीडच्या सुमारास घडली आहे. अशातच मुंबईतही चेंबूर भागात भिंत कोसळली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २ रिक्षांवर भिंत कोसळली आहे. या घटनेत कुणाचाही मृत्यू झाला नाही. रात्री २ वाजण्याच्या सुमारास ही भिंत कोसळली आहे. या ठिकाणी असलेला ढिगारा उपसण्याचे काम सुरू आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीतहानी झालेली नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.