मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेनबाबत संसदेमध्ये वादळी चर्चा

नवी दिल्ली – मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासंदर्भात लोकसभेमध्ये सरकार आणि विरोधकांमध्ये जोरदार वादळी चर्चा झाली. या प्रकल्पाचा खर्च अवाजवी असल्याचा आरोप विरोधकांनी केला. तर पूर्वीच्या सरकारनेच क्षुल्लक राजकीय लाभाचे प्रकल्प मंजूर केल्याचा आरोप सरकारच्यावतीने केला गेला.

प्रश्‍नोत्तराच्या तासादरम्यान 1.10 लाख कोटी रुपयांच्या बुलेट ट्रेनबाबतचा प्रश्‍न उपस्थित झाल्यावर कॉंग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी या प्रकल्पाचा खर्च अवाजवी असल्याचा आरोप केला. या प्रकल्पाच्या खर्च 1 हजार किलोमीटरच्या रेल्वेमार्गाच्या खर्चाच्या दुप्पट किंवा नवीन विभाग सुरू करण्यासाठे येणाऱ्या खर्चा इतका असल्याची टीका खर्गे यांनी केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्यावर पूर्वीच्या कॉंग्रेसच्या राजवटीमध्ये संकुचित राजकीय स्वार्थासाठी अनेक रेल्वे प्रकल्प मंजूर केले गेले होते, पूर्वीच्या रेल्वेमंत्र्यांनी आपल्या स्वतःच्या मतदारसंघांमध्ये अनेक रेल्वे प्रकल्प मंजूर केले. त्यासाठी रेल्वेच्या स्थितीचीही काळजी केली नाही, असा आरोप रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी केला. बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी जपानकडून 0.1 टक्का व्याजदराने 50 वर्षांसाठी जपानकडून अर्थसहाय्य उपलब्ध झाले आहे. तर या कर्जाच्या परतफेडीला 15 वर्षांची मुदतवाढ देण्याची तरतूदही आहे, असेही गोयल म्हणाले.

कॉंग्रेस राजवटीत मंजूर झालेले प्रकल्प 40 वर्षांनंतरही सुरू झाले नाहीत, असा शेराही गोयल यांनी लगावला. त्यावर कॉंग्रेसच्या सदस्यांनी जोरदार आक्षेप घेतला. त्याला भाजपच्या सदस्यांनीही प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केल्याने गोंधळात वाढच झाली. याच गदारोळात सभापती सुमित्रा महाजन यांनी पुढील प्रश्‍न चर्चेला घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)