मुंबईत 6 ते 9 जून दरम्यान मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई : उकाड्याने त्रस्त झालेले मुंबईकर ज्या पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत, तो मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे.  दरम्यान, जूनच्या पहिल्या आठवड्यातच मुंबईत मुसळधार पावसाचा धोका संभवत आहे. सहा ते नऊ जून या कालावधीत मुंबईत मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा स्कायमेटने दिला आहे. त्यामुळे या पावसाळ्याच्या सुरुवातीलाच मुंबईकरांची धावपळ होणार असल्याचे दिसत आहे.

मुंबईकरांनी मुसळधार पावसाच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर सतर्क राहण्याची आणि काळजी घेण्याची आवश्यकता आहे. पावसाळा सुरु होताच पूरस्थिती आ वासून उभी राहणार आहे. स्कायमेटच्या अंदाजानंतर मुंबई महापालिका आणि राज्य सरकारचीही आता धावाधाव सुरु झाली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने विविध योजना आखल्याचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी सांगितले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाडेश्वर स्वत: रस्त्यावर उतरुन नालेसफाईची पाहणी करत आहेत. मुंबईपुढे येणाऱ्या प्रत्येक आव्हानापुढे मुंबई पालिका सज्ज असल्याचे महापौर छाती ठोकून सांगत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)