मुंबईत लोकलसमोर ढकलून एकाची हत्या

मुंबई : किरकोळ वादातून एका प्रवाशाला धावत्या लोकलसमोर ढकलून त्याची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबईत मध्य रेल्वेवरील मुलुंड स्टेशनवर ही घटना घडली.

दीपक चमन पटवा असे मयत व्यक्तीचे नाव आहे. ते मुलुंड पश्चिमेला राहत होते. दीपक हे शनिवारी दुपारी मुलुंड स्टेशनच्या फलाट क्रमांक 3 वरुन प्रवास करण्यासाठी निघाले होते. त्यावेळी एक महिला आणि पुरुषासोबत त्यांची शाब्दिक बाचाबाची झाली. या बाचाबाचीत दोघांनी पटवा यांना समोरुन येणाऱ्या लोकलखाली ढकलले. ट्रेनखाली चिरडल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी कुर्ला लोहमार्ग पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवला असून अज्ञात आरोपींचा शोध पोलिस घेत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)