मुंबईत लेप्टोचा सातवा बळी

मुंबई – मुंबईत लेप्टोने दगावल्याचा आकडा आता सातवर पोहोचला आहे. कांदिवलीत तन्मय कमलेश प्राज्ञे या 16 वर्षीय तरूणाचा लेप्टोस्पायरोसिस या आजारामुळे दुर्दैवी अंत झाला. लेप्टोच्या आजारामुळे याआधी सहा जणांना आपला जीव गमवावा लागला होता.

तन्मय कमलेश प्राज्ञे हा मूळचा दापोलीचा होता. वडील हिऱ्याच्या कंपनीत हिरे पॉलिश करायचे काम करतात. तन्मयला दहावीत 70 % गुण होते. नुकतेच त्याने गोरेगावमधील पाटकर महाविद्यालयात वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला होता. महाविद्यालयात प्रवेश घेऊन आल्याच्या आनंदातच तन्मय आपल्या मित्रांसोबत कांदिवलीतील शिवमंदिराजवळ असलेल्या तलावात पोहण्यासाठी गेला. पण त्या तलावाच्या पाण्यात नजीकच्या नाल्याचे पाणी देखील मिसळत होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पोहून घरी आल्यानंतर तन्मयला संध्याकाळी ताप, उलटी आणि चक्करचा त्रास होऊ लागला. त्रास होत असल्यामुळे तन्मयच्या आई-वडिलांनी त्याला स्थानिक डॉक्‍टरांना दाखवले. पण त्याने काही फरक पडला नाही. काही दिवसांनी त्याला जास्तच त्रास होऊ लागला.

तन्मयला 24 जुलैला पुन्हा कांदिवलीतील अमर रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या टेस्ट केल्या असता त्याला लेप्टोची लागण झाली असल्याचे निष्पण्ण झाले. परंतु, त्या रुग्णालयात लेप्टोच्या उपचारासाठी सुविधा नसल्याने 25 जुलैला तन्मयला मालाड येथील सिद्धीविनायक मल्टिस्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)