मुंबईत तरुणावर फेरीवाल्यांचा चाकूहल्ला 

मुंबई: घाटकोपर रेल्वे स्टेशनजवळ फेरीवाल्या विक्रेत्यांनी एका तरुणावर चाकूने जीवघेणा हल्ला करत लुटल्याचा धक्‍कादायक प्रकार घडला. या हल्ल्यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला आहे. पहाटे पाच वाजता घडलेल्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.
घाटकोपर रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या खोत लेनमध्ये अंधाराचा फायदा घेत दोघांनी लुटण्याच्या उद्देशाने तरुणावर चाकू हल्ला केला. यामध्ये सागर सुरेश हिवरकर गंभीर जखमी झाला. हल्लेखोर आरोपी सलमान ताहीर शहा आणि समीर खलील अहमद सिद्धीकी हे दोघे याच खोत लेनमध्ये टोमॅटो विक्री करतात.
सागर शनिवारी सकाळी कामावर जायला चालत निघाला होता. आरोपींनी त्याला लुटण्याच्या उद्देशाने अडवले. त्याची बॅग, मोबाईल आणि पाकीट हिसकावून घेतले. मात्र त्याने विरोध करताच त्याच्या पोट आणि हातावर चाकूने वार केले.
रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सागरच्या मदतीला कोणीच धावून आले नाही. इतकंच काय पण जखमी सागरला सागर बोनान्झा इमारतीच्या सुरक्षारक्षकाने “इधर मत गिर भाई बिल्डिंगके बाहर जा” म्हणत इमारतीबाहेर काढण्याचा प्रयत्न केला. सध्या सागरवर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दोन्ही आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)