मुंबईच्या वेकंटेश शेट्टीला जे के टायर मान्सून स्कुटर रॅलीचे जेतेपद 

पुणे: गतविजेत्या वेंकटेश शेट्टीने जे के टायर आयोजित 29 व्या मान्सून स्कुटर रॅलीचे जेतेपद मिळवले असून स्पर्धेत झिशान सय्यदयाने दुसरा क्रमांकमिळवला तर सय्यद असिफ अलिला तिसरा क्रमांक मिळाला आहे. मुंबईच्या व्यंकटेशने सरूल गावातील पाच किमीचा लूप 19 मिनिटे व 13 सेकंदमध्ये पूर्ण केला. त्याने पहिल्या रनसाठी 6.13 मिनिटे, दुसऱ्या रनमध्ये 5.57 मिनिटे तर तिसऱ्या रनसाठी 6.03 एवढा वेळ घेतला.
मुंबईच्या झिशान सय्यदने दुसरे तर, टिव्हीएस रेसिंगच्या सय्यद आसिफ अलीने तिसरे स्थान मिळवले. त्यांनी अनुक्रमे 21.36 आणि 22.19 अशी वेळ नोंदवली.एफएमएससीआयची मान्यता असलेल्या स्कुटर रॅलीचे आयोजन स्पोर्टसक्राफ्टने केले असून शेवटच्या क्षणाला ही स्पर्धा मुंबईहुन नाशिक येथे स्थलांतरीत करण्यात आली. पण, तरीही या स्पर्धेला मोठे यश मिळाले. मुंबई, पुणे, भोपाळ, वडोदरा, रायगड, पनवेल व नाशिक येथून 34 रायडर्सने आपला सहभाग नोंदवला होता. यामध्ये दोन महिला रायडर्सचा देखील समावेश होता. एप्रिला व टिव्हीएस यांच्या संघांनी स्पर्धेत सहभाग नोंदवला होता.
रॅलीचे आम्ही यशस्वीरित्या आयोजन केल्याने आम्ही आनंदी आहोत. आम्हाला मूळ जागेवरून स्पर्धा दुसऱ्या ठिकाणी आयोजित करण्यासाठी 10 दिवसांचा कालावधी होता. असे आयोजक श्रीकांत करानी यांनी सांगितले. स्पर्धकांनी आमच्यावर विश्वास दाखवला व ते नाशिकला आले.
स्थानिक संघटना व संपूर्ण शहराने आम्हाला चांगला पाठिंबा दिला. असे करानी यांनी यावेळी सांगितले. एप्रिलाचा पिंकेस ठक्कर याला फेव्हरेट समजले जात होते. पण, त्याने रॅलीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या लूपमध्ये त्याच्या डोळ्यात काहीतरी गेल्याने त्याला स्पर्धेतून निवृत्त होण्याशिवाय पर्याय नव्हता. विजेत्यांना चषक व रोख पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)