मुंबईकरांचे केले कौतूक…

मुंबई – राज्यातील वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे होणाछया अपघाताला आळा घालण्यासाठी आणि सुलभ वाहतूकीकरीता वाहतूक नियोजनाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली जाणार आहे. त्यासाठी इंटलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीमचा वापर मुंबईत करण्यात येणार असून त्यानंतर ही यंत्रणा राज्यभर राबविण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली.

मुंबईत मोठ्या प्रमाणात वाहतूक असली तरी येथील नागरिक नियमांचे पालन योग्य रितीने करत असल्यामुळे कमी त्रास होतो. वाहनचालकांवरील कार्यवाही बरोबरच त्यांचे नियमासंबंधी लोकांचे प्रबोधन, जागृती होणे आवश्‍यक आहे. नागरिकांबरोबरच मुलांच्या वाहतूकविषयक शिक्षणासाठी राज्य शासन पावले उचलत आहे. परिवहन विभागाने राबविलेल्या “नो हॉकिंग’ हा उपक्रमातून मोठ्या प्रमाणात जनजागृती होत आहे. ही एक लोकचळवळ झाली आहे. बेशिस्त रस्ते तसेच अभियांत्रिकी क्षेत्राच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी देण्यात येत आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.

मुंबई, पणे शहरात 36 लाख वाहनांची नोंदणी
राज्यात सुमारे 3 कोटी 28 लाख वाहनांची नोंदणी झाली आहे. मुंबई, पुणे सारख्या शहरामध्ये 36 लाख वाहनांची नोंदणी झाली आहे, ही चिंतेची बाब आह, असे परिवहन मंत्री दिवकर रावते म्हणाले. मुंबई सारख्या शहरात त्यामुळे वाहनतळाची समस्या निर्माण झाली आहे. पुरेशा प्रमाणात वाहनतळे उभारल्याशिवाय ही समस्या सुटणार नाही. यासाठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतला आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामे झाली आहेत. रस्ते अपघात टाळण्यासाठी वाहतूक पोलीस मोठ्या प्रमाणात उपाय योजना राबवित असून आणखी प्रयत्न केले जात आहेत, असेही रावते यांनी यावेळी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)