मुंडण करून शिक्षणमित्रांनी केला यूपी सरकारचा निषेध

लखनौ (उत्तर प्रदेश) – उत्तर प्रदेशातील शेकडो शिक्षणमित्रांनी सामूहिक मुंडन करून उत्तर प्रदेश सरकारचा निषेध केला. मुंडण करणाऱ्या शिक्षणमित्रांमध्ये महिला शिक्षणमित्रांचाही समावेश आहे. आपल्या चार सूत्री मागण्यांसाठी शिक्षणमित्र गेले 70 दिवस इको गार्डन पार्कमध्ये धरणे धरून बसले आहेत.

25 जुलै 2017 रोजी उत्तर प्रदेश सरकारने समायोजन रद्द केले. तेव्हापासून 705 शिक्षणमित्र मरण पावले आहेत. त्यामुळे 25 जुलै हा दिवस शिक्षणमित्र काळा दिवस म्हणून पाळत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

70 दिवस धरणे चालू असून आजवर मुख्यमंत्री योगींनी आमची दखल धेतलेली नाही. दिलेली आश्‍वासने ते विसरून गेले आहेत. अधिकारी येऊन आम्हाला आश्‍वासने देऊन जातात. त्यामुळेच आम्ही आज मुंडन करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंडन करणे नारीसन्मानाच्या विरुद्ध आहे. इतक्‍या शिक्षणमित्रांचे प्राण जाऊनही सरकार आमचे अधिकार देत नाही. उच्च न्यायालयाचा निर्णय मानण्यासही सरकार तयार नाही. आमच्या चारसूत्री मागण्यांसाठी आमचे धरणे चालूच राहील असे शिक्षणमित्र मंजू लता हिने सांगितले.

पूर्णवेळ शिक्षकांचा दर्जा द्यावा आणि नियमाप्रमाणे पूर्ण वेतन द्यावे. जे शिक्षक आरटीई कायदा 2009 नुसार समाहित होऊ शकत नाहीत त्यांना भारत राजपत्र 2017 नुसार सहा. अध्यापक पद द्यावे आणि चार वर्षात टेट परीक्षा देण्याची सवलत द्यावी. असमायोजित शिक्षण मित्रांना बिहार मॉडेलनुसार समान वेतन द्यावे. मृत शिक्षकांच्या परिवारातील एका सदस्याला योग्यतेनुसार नोकरी द्यावी अशा काही शिक्षणमित्रांच्या मागण्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)