मुंज तोंडावर असताना बटूला लागला गळफास

– निगडीतील धक्‍कादायक घटना : परिसरात हळहळ

पिंपरी – मुंजीच्या तयारीत असताना बटूवर काळाने घाला घातल्याची हृदयद्रावक घटना आज (सोमवारी) निगडी येथे दुपारी दोनच्या सुमारास घडली. घरातील नातेवाईक मुंजीच्या तयारीत असताना चिमुरड्याला खेळता खेळता गळफास बसून होत्याचे नव्हते झाले.

नकुल उल्हास कुलकर्णी (वय 8, रा. श्री विहार सोसायटी, सिद्धी विनायकनगरी, निगडी) असे दुर्देवी मुलाचे नाव आहे.

नकुल हा आपल्या आजी-आजोबांबरोबर राहतो. या मुलाची 5 मे रोजी मुंज नियोजित होती. तो सोमवारी दुपारी बाहेरुन खेळून घरामध्ये आला. घरातील अभ्यास खोलीत गेला. त्या खोलीत एका कोपऱ्यात इलॅस्टीकचा पट्टा एका खिळ्याला अडकवला होता. त्याखाली अंथरुणाच्या घड्या घालून ठेवल्या होत्या. नकुल खेळताना त्या अंथरुणावर चढला. त्यावेळी त्याच्या गळ्यात पट्टा अडकला. अंथरुणाच्या घड्या पायाखालून निसटल्याने त्याला गळफास लागला. यावेळी घरामध्ये त्याचे आई-वडील होते. बराच वेळ नकुल बाहेर येत नसल्याने आई-वडीलांनी खोलीचा दरवाजा वाजवला. आतून काहीच प्रतिसाद येत नसल्याने त्यांनी दरवाजाचा कडी कोयंडा कापून खोलीत प्रवेश केला. त्यावेळी नकुल हा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात त्याला तातडीने उपचारासाठी दाखल केले. परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी घोषीत केले. नकुलची मुंज होणार असल्याने घरात आनंदाचे वातावरण होते. मुंजीच्या पत्रिका वाटल्या होत्या. तयारीची लगबग सुरु असताना हा प्रकार घडल्याने कुलकर्णी कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पुढील तपास देहूरोड पोलीस करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
1 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)