मी धोनीइतकाच ‘कूल’ – रोहित शर्मा

file pic

कर्णधार म्हणून जबाबदारी पार पाडताना आपणही महेंद्रसिंग धोनीइतकाच “कूल’ असतो, असा दावा रोहित शर्माने केला आहे. मी जेव्हापासून महेंद्रसिंग धोनीला क्रिकेट खेळताना पाहातो आहे, तेव्हापासून त्याचा शांत स्वभाव आणि कोणत्याही क्षणी गडबडून न जाता कमालीच्या थंडपणाने निर्णय घेण्याची क्षमता हा धोनीचा असामान्य असा गुण असून त्याच्या निर्णयक्षमतेत हीच बाब निर्णायक ठरली.

 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

खरे सांगायचे झाल्यास माझा स्वभावदेखील धोनीइतकाच शांत आहे, असे सांगून धोनीची प्रशंसा करताना रोहित म्हणाला की, मी गेल्या अनेक वर्षांपासून धोनीच्या नेतृत्वाखाली खेळतो आहे आणि त्याचा फायदा मला माझ्या कर्णधारपदाच्या काळात झाला. आमचा संघ जेव्हा जेव्हा अडचणीत सापडला, तेव्हा तेव्हा धोनीने पुढे येत संघाला त्यातून बाहेर काढले आहे. त्यामुळे त्याच्याकडून शिकण्यासारखे खूप काही आहे आणि संघातील सर्वच खेळाडू ते आत्मसात करण्याच्या प्रयत्नात असतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)