मी देखील सक्षम

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष फाळके यांचे लोकसभेसाठी संकेत
आ.कर्डिलेंच्या बालेकिल्ल्यात परिवर्तन यात्रेची सभा

नगर – निर्धार परिवर्तन यात्रेच्या निमित्ताने नगर दक्षिणेतील चार विधानसभा मतदारसंघात पक्षाच्या नेत्यांच्या सभा होत आहे. यावरून नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे राहणार असल्याचे स्पष्ट झाले असून पक्षाकडे अनेक सक्षम उमेदवार आहेत. राजेंद्र फाळके देखील सक्षम उमेदवार होवू शकतो. पक्ष नेतृत्वाने तसे आदेश दिले तर तेही करावे लागेल, असे मत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी पत्रकार परिषदेत व्यक्‍त केले.

फाळके यांच्या विधानामुळे आता राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष देखील लोकसभेसाठी इच्छुक असल्याचे समोर आले आहे. यापूर्वी भाजपचे जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड यांनी लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचे स्पष्ट केले होते. निर्धार परिवर्तन यात्रा दि. 31 रोजी नगर जिल्ह्यात येत आहे. कर्जतमध्ये दुपारी 12 वाजता सभा होणार असून त्यानंतर दुपारी 4 वाजता पारनेरमध्ये सभा होणार आहे. या सभेत शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख नीलेश लंके हे पक्षात प्रवेश करणार आहे.त्यानंतर दुसऱ्या दिवशी दि.1 रोजी दुपारी 1 वाजता पाथर्डीत तर सांयकाळी 6 वाजता आमदार शिवाजीराव कर्डिले यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या राहुरी विधानसभा मतदारसंघातील नगर तालुक्‍यातील जेऊर येथे सभा होणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या सभेसाठी पक्षाचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील, विरोधी पक्ष नेते धनजंय मुंडे, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, माजी मंत्री मधुकर पिचड आदी उपस्थित राहणार आहेत, असे फाळके यांनी सांगितले. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीकडे राहणार आहे. त्यामुळे परिवर्तन यात्रेच्या चार सभा या मतदारसंघात होत आहे. लोकसभेसाठी इच्छुक नाही पण पक्षनेतृत्वाने तसे आदेश दिले तर तेही करावे लागेल. पक्षात आजही अनेक सक्षम उमेदवार आहे. फाळके देखील सक्षम उमेदवार होवू शकतो असे सांगून फाळके यांनी चुकीच्या पद्धतीने अफवा कोण पसरवित असले तर ते दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी पक्षाचे सरचिटणीस सोमनाथ धूत उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)