मी कॉंग्रेसमध्येच राहणार

आमदार संग्राम थोपटे यांचे स्पष्टीकरण

भाटघर – मागील काही दिवसांपासून मी कॉंग्रेस सोडून इतर पक्षात जाणार असल्याच्या अफवेने चर्चेला उधाण आले होते, परंतु कॉंग्रेस हा पक्ष माझ्या रक्तात भिनला असून मी कोणत्याही पक्षात जाणार नाही, असे आमदार संग्राम थोपटे यांनी बुथ कमिटी कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्शन करताना स्पष्ट केले.

संगमनेर (ता. भोर) येथे तालुक्‍यातील जिल्हा परिषद नसरापूर-भोलावडे गटातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आमदार थोपटे बोलत होते. यावेळी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष शैलेश सोनवणे, जिल्हा परिषदेचे सदस्य विठ्ठल आवाळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अंकुश खंडाळे, विभागातील सरपंच, उपसरपंच व कार्यकर्ते उपस्थित होते.

आमदार थोपटे म्हणाले की, विधानसभेची निवडणूक तोंडावर आल्याने सर्वच राजकीय पक्षांमध्ये जोरदार हालचाली सुरू आहेत. 2014 साली मोदीची लाट असल्याने इतर पक्षांचा दारुण पराभव झाला होता. पुणे जिल्ह्यातून भोरची जाग कॉंग्रेसने राखली होती. भोर तालुक्‍यातील पंचायत समिती वगळता इतर ठिकाणी कॉंग्रेसचे साम्राज्य आहे.

तालुक्‍यात एकूण 3 जिल्हा परिषद सदस्य असून एक सदस्य कॉंग्रेसचा आहे. तर राजगड सहकारी साखर कारखाना, कृषी उत्पन्न बाजार समिती, खरेदी-विक्री संघ, खादी ग्रामोद्योग या सर्व ठिकाणी कॉंग्रेसची सत्ता आहे. गेल्यावर्षी भोर नगरपालिकेची निवडणूक झाली होती. यात नगराध्यक्ष व सर्वच्या सर्व नगरसेवक कॉंग्रेसचे निवडून आले होते. यात एकही जागा राष्ट्रवादी व इतर पक्षाला मिळवता आली नाही. यावरून तालुक्‍यात कॉंग्रेसचे वर्चस्व असल्याचे दिसून येते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)