मी इतका नीच माणूस आहे का?- नाना पाटेकर

तनुश्रीने केलेल्या आरोपांना तिला बॉलिवूडमधून मिळणाऱ्या पाठींब्यावर नानांना प्रश्न विचारले गेले, तेंव्हा तुम्ही मला कोणतेही प्रश्‍न विचारा मी त्याची उत्तरे देऊ शकेन. मला कोणत्याही प्रश्‍नांची उत्तरे द्यायला काहीच हरकत नाही. माझ्यासंदर्भात जर कोणते प्रश्‍न उपस्थित होत असतील, तर त्यांची उत्तरे माझ्याकडे आहेत. माझ्यावर झालेल्या आरोपांमध्ये तथ्य आहे, असे वाटत असेल, तर त्यावर कुणी कुणावर विश्वास ठेवायचा हा ज्याचा-त्याचा प्रश्न आहे.

मी इतका नीच माणूस आहे का?, माझ्याबद्दल इंडस्ट्रीमध्ये कुणाला काहीच माहीत नाही का?, असं प्रश्न नानांनी केले.
दरम्यान, मी चित्रपटात नाचणे टाळतो. मग माझ्यासोबत अश्‍लिल नाचगाणे करण्यासाठी कसे सांगेन, असा सवालही नानांनी यावेळी उपस्थित केला. तसंच लवकरच मुंबईत येऊन लोकांसमोर म्हणणं मांडणार असल्याचंही नानांनी यावेळी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान नानावरती असभ्यपणाचा आरोप करणाऱ्या तनुश्री दत्ताने दिग्दर्शक अतुल अग्निहोत्रीवरही तशाच प्रकारचे आरोप केले आहेत. इरफान खानला इक्‍सप्रेशन देणे सोपे जावे म्हणून अतुल अग्निहोत्रीने आपल्याला कपडे काढून डान्स करण्याची सूचना केली होती, असे तिने म्हटले आहे. अर्थात अतुल अग्निहोत्रीने हा आरोप फेटाळला आहे.

1 COMMENT

  1. नाना has to pay the price for his mis-adventure. He has ruined the carrier of an actress. The people supporting nana patekar are of lower level than him hence they are supportig him blindly. Amitabh refused to support him.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)