मिळकत हडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या सहा जणांवर गुन्हा

पिंपरी – एक भाऊ बेपत्ता आहे. दुसऱ्या भावाचा मृत्यू झाला आहे. असे असताना त्यांच्या बनावट सह्या करून ना हरकत प्रमाणपत्र बनवून त्या आधारे वडिलांची मिळकत परस्पर विकण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा प्रकार 12 सप्टेंबर 2013 ते 3 नोव्हेंबर 2018 या कालावधीत संत तुकाराम नगर, पिंपरी येथे घडला.

आशा राजेश सौदे (वय-45, रा. संत तुकाराम नगर, पिंपरी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार राजकुमार आत्तरसिंग सौदे (वय-44), निर्मावती आत्तरसिंग सौदे (वय-60, दोघे रा. संत तुकाराम नगर, पिंपरी), ज्योती विनोद लोधे (वय-33), विनोद लोहरीलाल लोधे (वय-37), संगीता नागेश नागरमोते (वय-49), योगेश हरिश्‍चंद्र नागरमोते (वय 49, सर्व रा. निगडी) यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आशा यांचे पती राजेश आत्तरसिंग सौदे यांचे 6 फेब्रुवारी 2011 रोजी निधन झाले. त्यापूर्वी राजेश यांचे भाऊ शिवकुमार आत्तरसिंग सौदे 2005 पासून बेपत्ता आहेत. आरोपी राजकुमार, निर्मावती आणि ज्योती हे फिर्यादी यांचे दीर आणि नणंद आहेत. आरोपींनी संगनमत करून आरोपींनी फिर्यादी यांच्या बेपत्ता दीर व मयत पतीची बनावट सही करून ना हरकत प्रमाणपत्र बनविले. त्या आधारे फिर्यादी यांच्या सासऱ्यांची मालमत्ता त्यांच्या सासूच्या नावावर करून ती परस्पर निगडी येथील संगीता नागरमोते यांना विकण्याचा कट रचला. ही बाब लक्षात येताच आशा यांनी पोलिसांत धाव घेतली. सहाय्यक पोलीस निरीक्षक अन्सार शेख तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)