मिडी बसमधून धुर निघाल्याने खळबळ

पुणे- पीएमपीच्या ताफ्यात नव्याने दाखल झालेल्या मिडी बसमधून अचानक धूर बाहेर येऊ लागला. चालक आणि प्रवाशांच्या ही गोष्ट लक्षात आल्याने बस थांबवून प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. यामुळे दुर्घटना टळली असली तरी नव्या बसेस असुनही असा प्रकार घडल्याने नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.

लक्ष्मी रोडवर दुपारी पावणेदोनच्या सुमारास ही घटना घडली. शनिपार ते निलज्योती या मार्गावर धावणारी ही बस असून लक्ष्मी रोडवर आल्यानंतर अचानक बसच्या इंजिनमधून धुर बाहेर आला. प्रवाशांच्या लक्षात आल्याने त्यांनी तत्काळ गाडी थांबवण्यास सांगितले. धुराचे प्रमाण प्रचंड असल्याने प्रवासीही घाबरून गेले होते. यानंतर तत्काळ ही माहिती अग्निशमन विभागाला देण्यात आली. यानंतर अग्निशमन विभागाकडून पाण्याची फवारणी करून नियंत्रण मिळवण्यात आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यानंतर पीएमपी अधिकाऱ्यांनी गाडीची पाहणी केली असून तांत्रिक बिघाड झाल्याने घटना घडल्याने प्रशासनाचे म्हणणे आहे, अशी माहिती जनसंपर्क विभागाकडून देण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)