मिडगुलवाडीत शाळेतील संगणकांची चोरी

शिक्रापूर- मिडगुलवाडी (ता. शिरूर) येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील खिडक्‍यांचे गज तोडून चोरट्यांनी शाळेतील दोन संगणक संच तसेच एक स्क्रीन चोरून नेली असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली आहे.
मिडगुलवाडी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये मुलांच्या शिक्षणासाठी संगणक संच, स्क्रीन तसेच इतर साहित्य आहेत. शनिवारी सकाळी शाळा सुटल्यानंतर शिक्षकांनी घरी जाताना शाळेच्या वर्गांना कुलूप लावले होते. रविवारी सुट्टी होती. सोमवारी सकाळी शिक्षिका रोहिणी नाईकरे व दमयंती मावळे या संगणक वर्ग उघडण्यासाठी गेल्या असता त्यांना वर्गात संगणक, स्क्रीन तसेच इतर साहित्य नसल्याचे दिसले आले.
त्यानंतर त्यांनी इतर शिक्षकांना बोलाविले व पाहणी केली असता वर्गाच्या खिडकीचे गज वाकलेले असल्याचे आढळून आले. त्यानंतर मिडगुलवाडी जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका दमयंती किसन मावळे (रा. मिडगुलवाडी कान्हूर मेसाई, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मधुकर खिलारे हे करत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)