मासुळकर कॉलनीतील “आवास’ योजनेला विरोध

पिंपरी – मासुळकर कॉलनीतील गट क्रमांक 79 वरील प्रस्तावित उद्यानाचे आरक्षण हटवून त्याठिकाणी पंतप्रधान आवास योजना राबविली जाणार आहे. या योजनेला स्थानिक रहिवाशांनी विरोध केला आहे.

प्रस्तावित प्रकल्पाविरोधात अंतरिक्ष, सागर, प्रेमआंगण सोसायटी, ग्रीन फिल्डस्‌, मनिष गार्डन, मेगा हाईटस्‌, स्वप्ननगरी सोसायटी मधील रहिवाशांना एकत्रित येत संयुक्तपणे याविरोधात लढा देण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठी संयुक्त संघर्ष समिती स्थापन करण्यात आली. हा प्रकल्प रद्द न केल्यास लढा तीव्र करण्याचा इशारा समितीच्या माध्यमातून देण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

समितीमध्ये भाऊसाहेब पांगारे, रवी खन्ना, संभाजी मगर, सुधाकर साटम, नितीन मंडलिक, दत्तानंद सोनवलकर, नागेश पवार, शंकर पिल्ले, हनुमंत पिसाळ, किशोर बोरकर, राजेंद्र भोसले, वेणू पिल्ले, अनंत लावंड, अविनाश चौगुले, विनायक पाटील, उल्का शेडगे, रवींद्र उन्नीथन, रॉबिन मॅथ्यू, प्रसन्ना जोशी, गिरीश नाईक, पंडितराव साळुंखे आदींचा समितीमध्ये समावेश आहे. समितीच्या नेतृत्वाखाली ग्रीनफिल्ड, प्रेम आंगण, मनिष गार्डन या सोसायट्यांमध्ये बैठका पार पडल्या. प्रकल्प रद्द होईपर्यंत बैठकांचे सत्र सुरू ठेवण्यात येणार आहे. प्रसंगी आंदोलन छेडण्याचा इशारा समितीने दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)