मासिक पाळी व्यवस्थापनाबाबत

राहुरी खुर्द येथे मुलींना मार्गदर्शन 
राहुरी विद्यापीठ – सबला किशोरी योजनेंतर्गत तालुक्‍यातील बारागाव नांदूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मदतीने राहुरी खुर्द, डिग्रस, गोटुंबा आखाडा येथील 11 ते 18 वर्षांच्या मुलींना मासिक पाळी व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. याबाबतच्या कार्यशाळेचे उद्‌घाटन पंचायत समिती सदस्य प्रदीप पवार, बाबासाहेब शेडगे, बालविकास प्रकल्प अधिकारी कल्हापुरे यांच्या हस्ते झाले. या वेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. कोरडे मॅडम यांनी मासिक पाळी व्यवस्थापनाबाबत मुलींना मार्गदर्शन केले. ऍड. सरोदे यांनी कायदेविषयक मार्गदर्शन केले. आहेर, काजळे यांनी कार्यशाळेचे नियोजन केले. या वेळी अंगणवाडीसेविका सुनीता म्हस्के, मदतनीस सुशीला मंडलिक, अंजना डोळस व मुली, महिला उपस्थित होत्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)