मासळी, मटण, चिकन स्थिर : अंडीच्या भावात वाढ

पुणे – सध्या आषाढ महिना सुरू आहे. तरीही मागील आठवड्यात आषाढी एकादशी आणि गुरूपौर्णिमा होती. त्यामुळे मासळीला मागणी कमी होती. येत्या मंगळवारी (दि. 31 जुलै) अंगारकी चतुर्थी आहे. त्यानंतर मासळीला मागणी वाढेल, असा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तविला आहे. रविवारी गेल्या आठवड्याच्या तुलनेत मासळीचे भाव स्थिर होते. मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे गेल्या आठवड्याच्या तुलनेत मटण आणि चिकनचे भाव स्थिर आहेत. वातावरणातील थंडाव्यामुळे अंड्याना मागणी वाढली आहे. त्यामुळे गावरान आणि इंग्लिश अंड्याच्या भावात शेकड्यामागे अनुक्रमे 10 आणि 15 रुपयांनी वाढ झाली आहे.
गणेश पेठ येथील मासळी बाजारात खोल समुद्रातील 8 ते 10 टन, खाडीची 200 ते 300 किलो, नदीची 1 ते दीड टना इतकी आवक झाली. आंध्र प्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची मिळून सुमारे 12 ते 14 टन आवक झाली.
खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे भाव) : पापलेट : कापरी : 1400, मोठे : 1400 , मध्यम : 1000 लहान :850, भिला : 550-600, हलवा : 600-700, सुरमई : लहान 600-700, मध्यम 900-1000, रावस : 600-700 घोळ : 600, करली : 360-400, भिंग : 280, पाला : 600-1200, वाम : पिवळी : लहान 280, मध्यम 550-650, काळी : 320, ओले बोंबील : लहान 160, मध्यम 200-240, कोळंबी ः लहान : 280, मोठी : 400 जंबोप्रॉन्स : 1400, किंगप्रॉन्स : 800, लॉबस्टर : 1400, मोरी : लहान : 200 मध्यम 360-400, मांदेली : 160 राणीमासा : 240, खेकडे : 200-240, चिंबोऱ्या : 400-440, खाडीची मासळी : सौंदाळे : 360, खापी : 320, नगली : लहान 280-320 मोठी 480-600, तांबोशी : 480, पालू : 360, लेपा : 160-240, शेवटे : 200-280 बांगडा : 180-220, पेडवी : 60, बेळुंजी : 160, तिसऱ्या: 160-180, खुबे : 160, तारली : 120. नदीची मासळी : रहू : 140, कतला : 150, मरळ : 360, शिवडा : 200, चिलापी : 50, मागुर : 100, खवली :200, आम्ळी : 60 खेकडे : 160, वाम : 480-550. मटण : बोकडाचे : 480, बोल्हाईचे : 480, खिमा : 480, कलेजी : 520. चिकन : चिकन : 130, लेगपीस : 160, जिवंत कोंबडी : 100, बोनलेस : 240. अंडी : गावरान : शेकडा : 690, डझन : 90 प्रति नग : 7.50 इंग्लिश : शेकडा : 489 डझन : 66 प्रतिनग : 5.5.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)