मावळात राष्ट्रवादीच्या गोटात अस्वस्थता

पिंपरी – मावळ लोकसभा मतदार संघाची दहाव्या फेरीपर्यंतच्या मतमोजणीचा निकाल जाहीर होत असताना शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे आघाडीवर असल्याने युतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहण्यास मिळाले. तर, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

सकाळपासून बालेवाडी येथील मतमोजणी केंद्रावर मावळ मतदारसंघाचा निकाल ऐकण्यासाठी कार्यकर्त्यांनी हळुहळु गर्दी करण्यास सुरवात केली. अंगाने उन्हाची काहिली होत असल्याने कार्यकर्ते झाडांखाली विखुरलेल्या अवस्थेत थांबलेले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भाजप-शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी, वंचित बहुजन आघाडी व अन्य पक्षांच्या कार्यकर्त्यांसाठी वेगवेगळी व्यवस्था केलेली होती. फेरीनिहाय निकाल जाहीर होताना क्षणाक्षणाला ताणली जाणारी उत्कंठा कार्यकर्त्यांमध्ये पाहण्यास मिळत होती. उत्साह, आनंद आणि निराशा अशा संमिश्र भावनांचे दर्शन घडत होते. बरेच कार्यकर्ते मोबाईलवरच हा निकाल पाहत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)