मावळात भगवाच, बारणेंना दोन लाखांचा लिड

पिंपरी – मावळ लोकसभा मतदार संघातून शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांनी तब्बल दोन लाख मतांची आघाडी घेतली आहे. त्यामुळे मावळवर भगवा फडकणार हे निश्चित झाले आहे.

मावळात 13 लाख 67 हजार मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क बजावला होता. 11 लाख मतांची मोजणी पुर्ण झाली आहे. त्यानुसार, श्रीरंग बारणे यांना 6 लाख 31 हजार 391, पार्थ पवार यांना 4 लाख 28 हजार 899, वंचित बहुजन आघाडीचे राजाराम पाटील यांना 64 हजार 259 मते मिळाली आहेत. 13 हजार 378 मते नोटाला मिळाली आहेत.

टपाली मतदान वगळता पहिल्या फेरीपासून श्रीरंग बारणे आघाडीवर असल्याचे पहायला मिळत आहे. त्यांची आघाडी मोडीत काढणे पार्थ पवार यांच्यासाठी अशक्य ठरले. वंचित बहुजन आघाडीचे राजाराम पाटील यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळत आहेत. बारणे यांनी विजयाची तयारी सुरू केली आहे. शिवसेना-भाजपच्या गोटात आनंदाला उधाण आले असताना राष्ट्रवादी काँग्रेस-क्राँग्रेस आघाडीत सन्नाटा पसरला आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here