मावळातील आणखी 27 गावांना मिळणार पोलीस पाटील

  • भरती प्रक्रिया सुरू : प्रांताधिकारी, बागडे, तहसीलदार देसाई यांची माहिती

वडगाव  – मावळ तालुक्‍यातील रिक्‍त असलेल्या 27 गावांतील पोलीस पाटील पदासाठी इच्छुकांनी 27 एप्रिलपर्यंत अर्ज दाखल करावेत, असे आवाहन प्रांताधिकारी सुभाष बागडे व तहसीलदार रणजित देसाई, नायब तहसिलदार सुनंदा भोसले यांनी केले आहे.

मावळ तालुक्‍यातील 156 पोलीस पाटील रिक्‍त पदे नुकतीच भरण्यात आली. उर्वरित रिक्‍त असलेल्या 27 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. इच्छुकांनी 27 एप्रिलपर्यंत अर्ज दाखल करावयाचे आहेत. त्यानंतर 30 व 1 मे रोजी दाखल अर्जंची छाननी होणार आहे. 2 मे रोजी पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध होईल. 5 ते 12 मे या कालावधीत पात्र उमेदवारांना वडगाव तहसीलदार कार्यालयात ओळखपत्र वाटप केले जाणार आहे.

तसेच 13 मे रोजी लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यानंतर उत्तराची विवरण प्रसिद्ध केली जाणार असून, 14 मे रोजी हरकती मागावणे व दि 15 मे रोजी दाखल हरकतीवर सुनवणी केली जाणार असल्याची माहिती नायब तहसीलदार सुनंदा भोसले यांनी दिली. 27 गावांमध्ये आकुर्डी, मंगरूळ, आंबेगाव, कुनेणामा, राकसवाडी (सर्व अनुसूचित जाती-जमाती महिला) कुसुर, पालेनाम, लवार्दी (सर्व अनुसूचित जाती जमाती) कोळे चाफेसर (भटक्‍या जमाती महिला) आतवण, कुसगाव खु, मालेवाडी, आपटी (सर्व भटक्‍या जमाती ब) नवलाख उंबरे ( भटक्‍या जमाती ड महिला) पाचाणे (भटक्‍या जमाती ड) शिरे, बोरीवली, अजिवली (सर्व इतर मागासवर्ग) भाजगाव, केवरे (सर्वसाधारण महिला) तुंगर्ली, वलवण, भुशी (विशेष मागासवर्ग) कडधे (विमुक्त जाती अ महिला) गेव्हंडे, आपटी, ब्रह्माणवाडी, बौर, करूंज (विमुक्‍त जाती अ) कातवी (इतर मागास प्रवर्ग भटक्‍या जमाती क व ड) या गावांची पदे रिक्‍त आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)