मावळच्या 12 फेऱ्या पुर्ण, बारणेंना दीड लाखांची आघाडी

पिंपरी – मावळ लोकसभा मतदार संघातून शिवसेनेचे श्रीरंग बारणे तब्बल 1 लाख 51 हजार मतांनी आघाडीवर आहेत. मावळातील 12 फेऱ्या पुर्ण झाल्या असून 17 फेऱ्या अद्याप शिल्लक आहेत. बारणेंची वाटचाल विजयाच्या दिशेने सुरू आहे.

श्रीरंग बारणे यांना 4 लाख 81 हजार 719, पार्थ पवार यांना 3 लाख 33 हजार 819, वंचित बहुजन आघाडीचे राजाराम पाटील यांना 47 हजार 780 मते मिळाली आहेत. 10 हजार 319 मते नोटाला मिळाली आहेत.

टपाली मतदान वगळता पहिल्या फेरीपासून श्रीरंग बारणे आघाडीवर असल्याचे पहायला मिळत आहे. त्यांची लाखाची आघाडी मोडीत काढणे पार्थ पवार यांच्यासाठी आव्हान ठरत आहे. 12 फेऱ्या् पुर्ण होवून 17 फेऱ्या शिल्लक आहेत. या फेऱ्यांमधून दीड लाखांचे बारणेंचे लिड तोडणे पार्थ यांच्यासाठी दिव्यच ठरणार आहे. उर्वरीत फेऱ्यांमध्ये काय होणार याबाबतची उत्सुकता ताणली गेली आहे. वंचित बहुजन आघाडीचे राजाराम पाटील यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळत आहेत. तर नोटाला चौथ्या क्रमांकाची मते मिळत आहेत.

.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.