माळेवाडीत इंजिन, पेरणी यंत्र पळविले

रेडा- पळसदेव भागातील नागरिक भुरट्या चोऱ्यांनी त्रस्त झालेले असताना त्यात आणखीन भर पडली. माळेवाडी येथील जगनाथ पंढरीनाथ बनसुडे यांच्या शेतातून लिस्टर कंपनीचे पाणी उपसा इंजिन चोरट्यांनी पळवले. एकूण 75 हजार रुपयाचा मुद्देमाल लंपास झाल्याची तक्रार इंदापूर पोलीस स्टेशनमध्ये बनसुडे यांनी दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी चार जणांना अटक केली आहे. मंगेश भारत शेलार, प्रशांत जालिंदर शेलार, माऊली मोहन फुले, ज्ञानेश्वर राजाराम बनसुडे (सर्व रा. माळेवाडी), अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त केले आहे. पुढील तपास व्ही. एस. जाधव करीत आहेत.

दरम्यान, माळेवाडी येथे मागील काही दिवसांपूर्वी घरातून दुचाकी चोरी झाली होती. त्याचा देखील पोलीस तपास करीत आहेत. बनसुडे यांनी शेतातील विहिरीवर पिकांना पाणी देण्यासाठी इंजिन बसवले होते.दि. 27 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजायच्या सुमारास इंजिन सुरू करण्यासाठी गेले होते. त्यावेळी इंजिन, गोठ्यातील पेरणीचे यंत्र चोरून नेल्याचे त्यांच्या लक्षात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.