माल वाहतुकदारांना आरटीओकडे नोंदणी करणे बंधनकारक

पिंपरी – वाहतूक कंपनी, माल वाहतूक व्यवसायातील वाहतुकदार, ठेकेदार, बुकींग एजंट, दलाल, कागदपत्रे, पाकिटे, मालाची पोहच करणाऱ्या कुरियर कंपनीला आता व्यवसाय करण्यासाठी आरटीओकडे नोंदणी करणे बंधनकराक केले आहे. प्रत्येक शहरात बाजारात, मार्केटयार्डमध्ये मालाची ने-आण करण्यासाठी अनेक वाहतूक कंपन्या कार्यरत आहेत.

बसस्थानक व स्टेशन परिसरात ट्रॅव्हल्सचे तिकीट बुकींग करणारे दलाल, एजंट व कंपनीची कार्यालये थाटली आहेत. मालाची साठवणूक करणारे, वितरक, माल जमा करणारे, व्यावसायिक यांना कॉमन कॅरिअर म्हणून क्षेत्रीय नोंदणी प्राधिकारी तथा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडे अर्ज करून नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त करणे आवश्‍यक झाले आहे. त्यामुळे ट्रान्सपोर्ट चालक, मालक, दलाल, एजंट व कुरिअर कंपन्यानी तातडीने आरटीओ कार्यालयाशी संपर्क साधून 31 मेच्या आत नोंदणी प्रमाणपत्र घेणे बंधनकारक केले आहे. अन्यथा मोटार वाहन अधिनियमातील तरतुदीनुसार कारवाई करण्याचा इशारा परिवहन आयुक्‍तांनी दिला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 च्या नियमात सुधारणा करून नियम 125 (एच) प्रमाणे 1 एप्रिलनंतर बाजारात येणाऱ्या सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या प्रवासी वाहनांना जीपीआरएस(लोकेशन ट्रॅकींग डिव्हाईस) व आपातकालीन बटन बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. याबाबत वाढीव मुदत देण्यात आलेली नाही. त्यामुळे नव्याने बाजारात येणाऱ्या बसना हा नियम लागू होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)