बारमाको (माली) – मालीच्या ईशान्येकडील नायगरच्या सीमेजवळ जिहादींनी केलेल्या हिंसाचारामध्ये 30 पेक्षा अधिक नागरिकांची हत्या करण्यात आली आहे. ठार झालेल्यांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. तुगर वंशियांना लक्ष्य करण्यासाठी गेल्या दोन दिवसात दुसऱ्यांदा अशा प्रकारचा मोठा हिंसाचार केला गेला आहे.
हा हिंसाचार शुक्रवारी झाला, असे तरेग बंडखोर गट “एमएसए’ आणि आदिवासींनी सांगितले. या हल्ल्याच्या एक दिवस आगोदर याच भागातील अन्देराम्बौकाने गावाजवळ मोटरसायकलवरून आलेल्या बंदुकधाऱ्यांनी 12 जणांना गोळ्या घालून ठार केले होते. दोन दिवसात 43 जण या हिंसाचारात मरण पावले आहेत. हे सर्वजण तुरेग या एकाच जमातीचे होते, असे आदिवासींच्या नेत्याने सांगितले. मनेगा प्रांतात तुरेग वंशियांविरोधात जिहादींच्या कारवाया वाढत आहेत. माली आणि नायगेर या दोन्ही देशातील सरकारांनी ताबडतोब या जिहादी कारवायांना अटकाव करावा, असे आवाहन “एमएसए’ या फुटिर गटाने केले आहे.
मालीतील हिंसक घडामोडींबाबत संयुक्त राष्ट्राच्या शांतता रक्षकांनीही चिंता व्यक्त केली आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा