मालमत्तेच्या सुरक्षित व्यवहारासाठी

अलिकडच्या काळात मालमत्तेच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत त्याचबरोबर मालमत्तेच्या खरेदी-विक्री व्यवहारातील फसवणुकीचे प्रकार आजही कायम आहेत. अशा स्थितीत मेहनतीचा पैसा सुरक्षित राहवा आणि व्यवहार पारदर्शक व्हावे यासाठी काही गोष्टीची काळजी घेणे गरजेचे आहे. यासंदर्भातील आवश्‍यक टप्प्यांची माहिती इथे सांगता येईल.

ऍनकॅम्ब्रस सर्टिफिकेट (इ.सी)
ही कागदपत्रे मालमत्तेच्या पूर्वीच्या व्यवहाराची माहिती देते.
जमीनीच्या खरेदी-विक्रीसाठी हे कागदपत्रे महत्त्वाचे मानले जाते.
आता अनेक राज्यात अशा प्रकारच्या कागदपत्रांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची देखील सुविधा उपलब्ध आहे. त्यानुसार संबंधित कागदपत्र अर्जकर्त्याच्या घरी पाठवले जाते. या बाबतीत तमिळनाडू अग्रेसर आहे.
सातबारा
सातबारा हा जमिनीवर मालकी हक्क दर्शविणारा कागद होय. नोंदणी कार्यालयात ज्याच्या नावावर जमीन आहे, त्याच्या नावाने सातबारा काढला जातो.
हे कागदपत्र जमीनीवर मालकी हक्क दाखवण्यासाठी उपयुक्त ठरतो.

सातबारावर मालमत्तेच्या आकारमानाबरोबरच अन्य काही महत्त्वाच्या गोष्टी देखील नमूद केलेल्या असतात.
सातबारा हा जमीनीच्या रेकॉर्डसंबंधी देखील असतो, त्यावर असलेल्या इमारतीची माहितीही दिलेली असते.
मोकळा भूखंड खरेदी करताना
मालमत्ता विक्रेत्याकडे जमीन विकताना जमीनीशी संबंधित ना हरकत प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे.
लेआऊट आणि विकास प्राधिकरणाकडून मान्यता किंवा पालिकेची परवानगी असणे आवश्‍यक आहे.
मोकळ्या भूखंडासाठी आवश्‍यक लॅंड यूज आणि मास्टर प्लॅननुसार अन्य सर्वप्रकारच्या मंजुरी असणे गरजेचे आहे.

भूखंडाबरोबर असलेल्या रस्त्याच्या देखभालीची जबाबदारी स्थानिक पालिकेकडे असणे.
गाईडलाइन व्हॅल्यू निश्‍चित करताना गृहित धरलेल्या आधारावर मोकळा भूखंड, जमीन किंवा फ्लॅटची खरी किंमत आहे, हे हे कळते.

 सतीश जाधव 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)