मालपाणी उद्योग समूहाच्यावतीने सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन

संगमनेर – समाजकार्य करणारी खुप माणसं असतात, परंतु आपण समाजाचे देणं लागतो या भुमिकेतून काम करणारी मंडळी अभावानेच सापडतात. आपल्याला मिळालेल्या पैशातून शेवटच्या घटकाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मालपाणी परिवाराकडून सुरु असलेले विविध सामाजिक उपक्रम कौतुकास्पद आहेत असे प्रतिपादन राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी केले.

मालपाणी उद्योग समूहाच्यावतीने आयोजित सर्वधर्मिय सामुदायिक विवाह सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी राज्याचे माजी मंत्री, आमदार बाळासाहेब थोरात, आमदार डॉ.सुधीर तांबे, नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, श्रीमती ललितादेवी मालपाणी, श्रीमती सुवर्णाकाकी मालपाणी, मालपाणी उद्योग समूहाचे अध्यक्ष राजेश मालपाणी, डॉ.संजय, मनिष व गिरीश मालपाणी आदी उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलतांना नामदार देशमुख यांनी या विवाह सोहळ्याचे भरभरुन कौतुक करतांना यात सहभागी झालेल्या उच्चशिक्षित वधु-वरांचे अभिनंदन केले. मुला-मुलीचे लग्न म्हणजे आई-वडीलांसाठी कर्जाचा डोंगर असतो. आपल्या आसपासचे लोकही लग्नकार्य जोरात करण्यासाठी आपल्याला प्रेरीत करीत असतात. मात्र त्यासर्वांचे ऐकूनही सामुदायिक विवाह सोहळ्यात आपल्या पाल्यांचे लग्नकार्य उरकणार्‍या माता-पित्यांची भुमिका समाजासाठी प्रेरणादाय असल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)