मार्गिका भुयारी केल्यास दहशतवादी हल्ल्याचा धोका

एमएमआरसीएलचा दावा
मुंबई – मेट्रोची मार्गिका ठरविण्याचा कायद्यानुसार अंतिम अधिकार हा आमचा आहे आणि तो भुयारी न करण्याचा निर्णय घेतला आहे. जर मेट्रो 2बी मार्गिका आता भुयारी केल्यास दहशतवादी हल्ल्याचा धोका आहे, असा दावा एमएमआरसीएलने न्यायालयात केला. मेट्रो-2ए आणि 2बी चा मार्गिका आराखडा तयार असून 2 एचे काम आता अंतिम टप्प्यात असून त्याला 2बी ची मार्गिका जोडण्यात आल्याने आता भुयारी करणे शक्‍य नसल्याने ऍड. मिलींद साठे यांनी स्पष्ट केले.

व्हीपीडी परिसरातून जाणा-या मेट्रो-2 बीच्या मार्गिकेचे भुयारीकरण करण्यात यावे, अशी विनंती करणारी जनहित याचिका जुहू-विलेपार्ले रहिवासी संघाने उच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेवर प्रभारी मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती गिरीष कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी ऍड. मिलींद साठे यांनी याचिकेला जारेदार विरोध केला. 11 हजार कोटीच्या या प्रकल्पाचा आरखडा तयार झालेला असून त्यात बदल करणे आता शक्‍य नाही. मेट्रो-2ए ला 2बी जोडण्यात येणार असल्याने जर ही मार्गिका भुयारी केल्यास खर्च मोठ्या प्रमाणात वाढण्याची भीती व्यक्त केली. तसेच आराखड्यानुसार मेट्रो 2बीची मार्गिका ही उन्नत मार्गावरून जाणार आहे.

ठराविक विभागातील स्थानिक रहिवाशांना त्रास होईल म्हणून मार्गात बदल करणे हे रास्त नाही. तसेच भुयारी मार्ग हा खर्चीक असून त्याला लागणार वेळ आणि मुख्य म्हणजे किंमत ही अनेक पटींनी जास्त आहे. त्यामुळे या परीसरातील मेट्रो भुयारी करण्याचा निर्णय व्यवहार्य नसल्याचे एमएमआरसीएलने न्यायालयात स्पष्ट केले.

यावेळी याचिकाकर्त्यांच्या वतीने ऍड. व्यकंटेश धोड यांनी दशहतवादी हल्ल्याच्या दाव्याला जोरदार आक्षेप घेतला. हा मार्ग भुयारी केल्यास दशहशतवादी हल्ल्याची आता भिती वाटते तर मेट्रो-3च्या भुयारी मार्गाला दहशतवादी हल्ल्याचा धोका नाही का? असा सवाल उपस्थित केला. तसेच परिसरात नेहमीच वाहतूकीची समस्या असताना मेट्रोच्या कामामुळे त्यात आणखी भर पडणार आहे, असा दावा केला. न्यायालयाने याची दखल घेऊन याचिकेची पुढील सुनावणी 17 सप्टेंबरपर्यंत तहकूब ठेवली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)