मार्केट यार्ड ठप्प

मराठा आंदोलनाला पाठींबा देत आडते असोसिएशन आणि कामगार युनियनने पुकारलेल्या संपाला उत्सूर्त प्रतिसाद


सोमवारी दिवसभरात कोणतीही उलाढाल झालीच नाही

पुणे – सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षणासाठी पुकारलेल्या राज्यव्यापी आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड आडते असोसिएशन आणि कामगार युनियनने पुकारलेल्या लाक्षणिक बंदाला सोमवारी उत्सूर्त प्रतिसाद लाभला. शेतीमालाची आवक-जावक झालीच नाही. खरेदी-विक्रीचे व्यवहार न झाल्याने मार्केट यार्ड ठप्प बनले होते.
राज्यात आरक्षणासाठी मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. सर्वत्र जोरात आंदोलन सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर आडते असोसिएशन आणि कामगार युनियनने या आंदोलनाला पाठींबा दिला आहे. याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी एक दिवसीय लाक्षणीक बंदचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत सोमवारी शेतकऱ्यांनी शेतीमाल विक्रीसाठी बाजारात आणलाच नाही. बंदची पूर्वीच कल्पना दिल्याने किरकोळ विक्रेते आणि खरेदीदार खरेदीसाठी आलेच नाहीत. त्यामुळे फळे, भाजीपाला, कांदा-बटाटा, पान आणि केळी विभागातील कामकाज दिवसभरासाठी ठप्प झाले होते. भुसार बाजारात दुकाने चालू होती. मात्र, व्यवहार झाले नाहीत. येथील कामगार संपात सहभागी झाले होते. बटाटा विभागात उत्तरप्रदेश, आग्रा भागातून काही ट्रकची आवक झाली. मात्र, त्या तशाच उभ्या आहेत. त्यातील माल काढणे आणि मालाची विक्री उद्या (मंगळवारी) होणार आहे. एकंदरीत मार्केट यार्डात सोमवारी ठप्प झाले होते. याविषयी श्री छत्रपती शिवाजी आडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ म्हणाले, मार्केट यार्ड बंद शंभर टक्के यशस्वी झाले आहे. येथे आज कसलीच उलाढाल झाली नाही. यामुळे मराठा आरक्षणाविषयी असलेल्या आमच्या भावना सरकापर्यंत पोहोचतील, सरकार योग्य निर्णय घेईल, अशी अपेक्षा आहे. तर, कामगार श्री छत्रपती शिवाजी कामगार युनियनचे सचिव संतोष नांगरे म्हणाले, कामगारांचा मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठींबा आहे. मराठा आरक्षणाविषयी सरकारने वेळीच योग्य निर्णय घ्यावा. आरक्षण द्यावे. अन्यथा कामगार संघटना 9 ऑगस्टपासून बेमुदत बंद पुकारतील.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)