मारुती मोटारकडून कार कनेक्‍ट यंत्रणा 

नवी दिल्ली: मारुती सुझुकी इंडियाकडून पहिल्या टेलिमॅट्रिक कंट्रोल युनिटनिर्मिती करण्यात आली आहे. सुझुकी कनेक्‍ट भारतात लॉंच करण्यात आले आहे. मारुती आणि सुझुकी मोटार कॉर्पोरेशन यांचेकडून संयुक्‍तपणे भारतीय बाजारपेठेचा विचार करून ही यंत्रणा तयार करण्यात आली असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
तात्काळ अलर्ट पाठवण्यात येऊन सुझुकी कनेक्‍ट या मोडेमच्या साहाय्याने अपघतात किंवा अन्य कोणत्याही प्रसंगी या माध्यमाचा वापर केल्यास आपले कुटुंब, मित्रमंडळी यांना तत्काळ संदेश या माध्यमातून पोहोचणार आहे. यातून संदेश पाठवण्यासोबतच जीपीएसला कोऑरिडेन्ट आणि आपल्या वाहनांचा तपशील या माध्यमातून दिला जातो.
वरील सुविधा सोबतच आपल्या कारमध्ये कोणताही बिघाड झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर मारुती सुझुकी इंडियाच्या ग्राहक तक्रार विभागाला तो संदेश पाठवण्यात येणार आहे.
कार कोणत्या ठिकाणी पार्क करण्यात आली आहे. त्यांची वेळ आणि त्याचे लाईव्ह लोकेशन तपासता येणार आहे. कार ड्रायविंहग करताना चालकांला यातून महत्त्वाच्या टिप्स देण्यात येणार असून सुरक्षित वाहन चालवणे सोपे होणार असल्याची माहिती यावेळी कंपनीच्या अधिकाऱ्याकडून सांगण्यात आली. मागील वर्षांत जागतिक बाजारपेठेत कनेक्‍ट कारच्या सुविधेमध्ये 18 टक्‍क्‍यांची वाढ दिसून आली आहे. तर भारतीय बाजारपेठेत आता सुरुवात झाली असल्याने येत्या 2020 साला पर्यंत कनेक्‍ट कार या सुविधेमध्ये एकूण 2.6 टक्‍क्‍यावर पोहोचणार असल्याचा अंदाज मारुती सुझुकीचे वरिष्ठ कार्यकारी अधिकारी आर.एस. क्‍लसी यांनी व्यक्त केला आहे. मोबाईल आणि सेंसर तंत्रज्ञान वाढल्यामुळे बऱ्याच कार कंपन्या अशाप्रकारची सेवा समाविष्ठ करण्याच्या प्रयत्नात आहेत.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)