मारहाण प्रकरणी तीन अटक

पिंपरी  – मोटरसायकल वळवताना धक्‍का लागल्याच्या कारणावरुन झालेल्या मारहाण प्रकरणी निगडी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केले असून एकूण दहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. अब्दुल हमीद उर्फ फिरोज चौधरी (वय 25, रा. कुदळवाडी, चिखली) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार मारहाण करणा-यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, असद अली मोहम्मद अली शेख (वय 21, रा. कुदळवाडी, चिखली, पुणे), महमद सलमान महमद असद चौधरी (वय 21, रा. कुदळवाडी, चिखली, पुणे), सोएब जाकिर सैय्यद (वय 21, रा. कुदळवाडी, चिखली, पुणे) व इतर सहा ते सात अशी आरोपींची नावे आहेत. फिर्यादी अब्दुल हमीद चौधरी शनिवारी रात्री कुदळवाडी चौकातून जात होते. चौकातून गाडी वळवत असताना चौधरी यांच्या गाडीचा धक्का आरोपींना लागला. यावरुन सोएब व सलमान यांच्यासोबत वाद झाला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

याचाच राग मनात धरुन त्यांनी फिर्यादी व त्यांचे मित्र इरफान चौधरी, अयूब शेख, उस्मान चौधरी मैऊद्दीन चौधरी, अनिस यांच्यासोबत वाद घालून जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने आरोपींनी लाठ्या-काठ्यांनी मारहाण करुन गंभीर जखमी केले. यामध्ये चौधरी गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यावरून निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलीस ठाण्याचे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक एस.व्ही.अवताडे पुढील तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)