मारन बंधुंवर पुन्हा खटला चालणार…

बेकायदा टेलिफोन एक्‍सचेंजचे प्रकरण
चेन्नाई – आपल्या मालकीच्या सन टीव्ही कंपनीसाठी बेकायदा टेलिफोन एक्‍सचेंज चालवल्या प्रकरणी माजी दूररसंचार मंत्री दयानिधी मारन आणि त्यांचे बंधु कलानिधी मारन यांना निर्दोष सोडण्याचा सीबीआय न्यायालयाचा आदेश मद्रास उच्च न्यायालायाने रद्दबातल ठरवला असून या प्रकरणी मारन बंधुंवर पुन्हा खटला चालवण्याचा आदेश न्यायालयाने दिल्याने मारन बंधु अडचणीत आले आहेत.

दयानिधी मारन हे युपीए सरकारच्या काळात केंद्रीय दूरसंचारमंत्री होते त्यावेळी त्यांनी त्यांच्या अधिकारात सन टीव्हीसाठी जादा टेलिफोन लाईन्सचे एक्‍सचेंजच तेथे सुरू केले होते. ते पुर्ण बेकायदेशीर होते असा त्यांच्यावर आरोप आहे. त्यांना या प्रकरणात सीबीआयने निर्दोष सोडल्यानंतर सीबीआयने त्या निकालाला मद्रास उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तेथे उच्च न्यायालयाने सीबीआयची आव्हान याचिका ग्राह्य धरून आधीचा निकाल रद्दबातल ठरवला. दयानिधी मारन यांच बंधु कलानिधी मारन हे सन टीव्हीचे मालक आहेत. त्यांच्यावरील आरोप सकृत दर्शनी योग्य दिसत नाहींत असे नमूद करून मारन बंधुंना सीबीआय कोर्टाने निर्दोष ठरवले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)