मायावती – शरद पवार यांच्यात गुप्त भेट

राजकीय वातावरण तापले : पंतप्रधान आणि महाआघाडीवर चर्चा
नवी दिल्ली – बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गुप्त भेटीनंतर दिल्लीतील राजकीय वातावरण तापले आहे. दोन्ही नेत्यांनी पंतप्रधानपदाच्या मुद्यासह लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत आघाडीबाबत चर्चा केली असल्याचे समजते.

बसपा प्रमुख मायावती यांनी पवार यांची बुधवारी गुपचूप भेट घेवून चर्चा केली. चर्चेचा तपशील कळू शकला नसला तरी दोन्ही नेत्यांनी पंतप्रधानदाचा उमेदवार आणि लोकसभेच्या निवडणुकीतील महाआघाडीच्या मुद्यावर चर्चा केली असल्याचे समजते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कॉग्रेसने अलिकडेच पंतप्रधानपदाच्या मुद्यावर लवचीक भूमिका जाहीर केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजप सरकारला रोखण्यासाठी कॉंग्रेस कोणत्याही पक्षाच्या नेत्याचा पंतप्रधान म्हणून स्वीकार करण्यास तयार आहे, असे कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले होते.

कॉंग्रेसच्या या भूमिकेनंतर सर्व राजकीय पक्षांमध्ये अग्रभागी येण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. तृणमूल कॉंग्रेसचे नेते पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे नाव पुढे करीत आहे. तर देशात शरद पवार यांच्या उंचीचा दुसरा एकही नेता नाही, असा दावा राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून केला जावू लागला आहे.

महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेनेच्या संबंधावर विरजण पडले आहे. या मुद्यावर सखोल चर्चा झाली असल्याचे समजते. शिवाय, पंतप्रधानपदाच्या मुद्यावर मायावती ताक सुध्दा फंकून पित आहेत. या मुद्यावर पवार यांना सोबत घेण्याचा प्रयत्न असल्याचे समजते.

महत्वाचे म्हणजे, दोन्ही नेत्यांमध्ये कोणत्या मुद्यांवर एकमत झाले याबाबतचा अधिकृत तपशील कळू शकला नाही. मात्र, मायावती-पवार भेट महत्त्वाची मानली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)