मायणी पोलिसांचा दारू अड्ड्यावर छापा

सातारा, दि. 1 (प्रतिनिधी)

खटाव तालुक्‍यातील कलेढोण येथील एका दारू अड्ड्यावर मायणी पोलिसांनी बुधवारी सायंकाळी छापा टाकला. यावेळी देशी- विदेशी दारूच्या 16 बाटल्या पोलिसांकडून जप्त करण्यात आल्या. मात्र, संशयित बुधावले हा अंधाराचा फायदा घेत पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

अवैध दारू विक्री केल्याप्रकरणी लक्ष्मण मल्हारी बुधावले (रा. कलेढोण,ता. खटाव) याच्याविरोधात मायणी पोलीस दुरक्षेत्रात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, कलेढोण (ता. खटाव) येथे लक्ष्मण बुधावले हा देशी- विदेशी दारूची अवैध विक्री करत असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक शहाजी गोसावी यांना मिळाली होती.

त्यानुसार गोसावी यांनी बुधवारी सायंकाळी आठच्या सुमारास कलेढोण येथे बुधावलेच्या घरी छापा टकला. यावेळी पोलिसांनी सुमारे एक हजार रुपयांच्या देशी- विदेशी दारूच्या 16 बाटल्या जप्त केल्या.

मात्र, अंधाराचा फायदा घेत बुधावले पसार झाला आहे. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक शहाजी गोसावी, हवालदार नवनाथ शिरकुळे, बापूराव खांडेकर, नितेश काळे यांनी केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
1 Comment
  1. राजन रामलिंग लिगाडे says

    हे सर्व झालं पण ग्रामपंचायत कर्मचारी यांचे काय वेतन वाढवणार
    ककाय

Leave A Reply

Your email address will not be published.