मायणीत शिवजयंती उत्साहात साजरी

मायणी, दि. 19 (प्रतिनिधी) – आपल्या असामान्य गुणांमुळे जनमानसांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणारा जाणता राजा अर्थात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मायणी येथे उत्साहात साजरी करण्यात आली. युवकांनी सकाळी प्रतापगडावरून आणलेल्या शिवज्योतीची गावातून ग्रामप्रदक्षणा काढण्यात आली. त्यानंतर सायंकाळी चांदणी चौकात विविध मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली.मायणी परिसरतील विविध सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था आदी ठिकाणीही शिवजयंती उत्साहात पार पडली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.