मामाच्या गावाला निघालेल्या मुलाचा रेल्वेतून पडून मृत्यू

पिंपरी – मामासोबत गावी जाण्यासाठी निघालेल्या तेरा वर्षीय मुलाचा इंद्रायणी एक्सप्रेसच्या दारातून तोल जाऊन खाली पडल्याने मृत्यू झाला. ही दुर्घटना बुधवारी सकाळच्या सुमारास चिंचवड स्थानकावर घडली.

अर्जुन कृष्णा रमेशराव (वय-13, रा.डोंबिवली वेस्ट, मुंबई) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्जुन हा मामाच्या गावी जाण्यासाठी इंद्रायणी एक्सप्रेसने मामासोबत सोलापूरच्या दिशेने जात होता. आज सकाळी रेल्वे चिंचवड स्थानकाजवळ येताच तो रेल्वेच्या दारातून तोल जाऊन खाली कोसळला. यामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. लोहमार्ग पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.

दरम्यान, पिंपरी रेल्वे स्थानकावर आजच सकाळी लोहमार्ग ओलांडत असताना रेल्वे गाडीची धडक बसल्याने 45 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. मृत व्यक्तीची ओळख पटली नसून ओळख पटविण्याचे काम सुरु आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)