“मान्सून फुटबॉल’मध्ये झळकणार सागरिका

बॉलीवूडमध्ये सागरिका घाटगेने “चक दे इंडिया’ या चित्रपटातून चाहत्यांच्या मनामध्ये स्वतःचे असे वेगळे स्थान निर्माण केले आहे. भारतीय हॉकीपटू प्रीती सबरवाल हिला एक नवीन ओळख मिळाली असून चित्रपटात सागरिकाने साकारलेल्या तिच्या भूमिकाही सर्वांना प्रभावित करणारी होती. त्यानंतर चाहत्यांच्या मनावर अधिराज्य करण्यासाठी सागरिका पुन्हा एकदा नवीन आव्हान घेवून येत आहे. हे तिने नुकतेच पोस्ट केलेल्या पोस्टरवरून स्पष्ट होत आहे. यात सागरिका खूपच स्टनिंग दिसत आहे.

सागरिका घाटगे लवकरच “मान्सून फुटबॉल’ या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच तिने शेअर केले आहे. यात हिरव्या रंगाच्या साडीत असलेली सागरिका फुटबॉलसोबत दिसत आहे. ती पावसात चिंब भिजलेली असून या सिंपल लुकमध्येही ती खूपच सुंदर दिसत आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी सागरिकाचा फुटबॉल सामना खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यावरूनच तिचा फुटबॉलवरी एखादा चित्रपट येणार असल्याचा कयास लावला जात होता. सध्या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले असून लवकरच चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख निश्‍चित करण्यात येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.