मान्सून केरळात दाखल

 

पुणे,- भारतीय शेती अर्थव्यवस्थेला चालना देणारा मान्सून आज केरळात दाखल असल्याचे हवामान विभागाच्यावतीने जाहीर करण्यात आले. संपुर्ण केरळ राज्य आणि तामिळनाडूचा काही भाग या मान्सूनने व्यापला आहे.नियोजित वेळेपेक्षा मान्सून तीन दिवस आधीच दाखल झाला आहे. दरम्यान सध्या केरळ राज्यात कालपासून मुसळधार पाऊस पडत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नियोजित वेळे पेक्षा तीन दिवस आधीच मान्सून केरळात दाखल होईल असा अंदाज यापुर्वीच हवामान खात्याने दिला होता त्याप्रमाणे आज 29 मे रोजी अखेर तो दाखल झाला. अंदमान बेटांवर यंदा नियोजित वेळेपेक्षा पाच दिवस उशीरा मान्सून दाखल झाला त्यानंतर मात्र त्याने झपाट्याने वाटचाल करत आज अवघा तीन ते चार दिवसात तो केरळात दाखल झाला आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढल्यानेच मान्सूनच्या वाटचालीला बळ मिळाले.

गेल्या तीन ते चार दिवसात वातावरणात मोठे बदल झाले अरबी समुद्रात केरळ आणि कर्नाटकच्या किनाऱ्यावर रविवारी निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र सोमवारी तीव्र झाले होते. यातील कर्नाटकच्या किनारपट्टीवरील कमी दाब तर बंगालच्या उपसागरामध्ये पूर्वमध्य भागामध्ये सोमवारी आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे.यामुळे मान्सून वेगाने पुढे सरकला

केरळमध्ये सध्या जोरदार पाऊस सुरु आहे. इथल्या सगळ्या हवामान केंद्रांवर पावसाची नोंद करण्यात आली. गेल्या वर्षी 30 मे रोजी मान्सून केरळात दाखल झाला होता. केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर साधारण पुढच्या सात दिवसांत तो महाराष्ट्रात धडकतो. मान्सूनच्या पुढील प्रवासासाठी वातावरण अनुकूल असल्याने राज्यातही मान्सूनचं वेळेत आगमन होईल असं म्हटलं जात आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रात 7 जूनला पाऊस येणार, असं हवामान खात्यानं सांगितलंय. महाराष्ट्राला सध्या वेध लागलेत ते पावसाचे. उकाड्याने हैराण झालेल्यांना आता प्रतिक्षा आहे ती पावसाची. गेल्या दोन दिवसांपासून रत्नागिरीमध्ये अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस पडतोय. तर सिंधुदुर्गातही अनेक ठिकाणी सरी पडतायेत.
याशिवाय विदर्भ आणि मराठवाड्यात ही पावसाने हजेरी लावली आहे.मध्य महाराष्ट्रात मात्र अद्याप मान्सूनपुर्व पावसाने जोरदार हजेरी लावलेली नाही. यंदा मान्सून हा सरासरी इतका राहिल असं भाकीत हवामान संस्थेनं आधीच वर्तवलंय.

पुण्यात मात्र पावसाची हुलकावणी
पुणे शहरात ही गेले दोन दिवसांपासून तापमान घट होऊन वारे वाहण्यास सुरवात झाली आहे.आकाशात ढगांची गर्दी होते पण पाऊस पडत नाही अशी स्थिती सध्या आहे. मंगळवारी सकाळी पावसाळी वातावरण निर्माण झाले होते त्यामुळे पाऊस पडेल अशी शक्‍यता होती पण पावसाने हुलकावणी दिली. आज शहरातील तापमान हे 37 अंश पर्यत खाली घसरले होते. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार पुणे शहर आणि परिसरात ढगाळ वातावरण राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)