माध्यमे माझ्या मोदीविरोधी वक्तव्यासाठी प्रयत्नशील हे मोदींना माहिती : बॅनर्जी 

नवी दिल्ली : प्रसिध्दी माध्यमे मला मोदींविरोधात विधाने करण्यास उद्यक्त करत आहेत, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माहित आहे, असे नोबेल पुरस्कार विजेते अभिजित बॅनर्जी यांनी हसत हसत हसत सांगितले. ते मोदी यांची भेट घेऊन आल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते.

मला मोदी विरोधी वक्तव्य करण्यासाठी माध्यमे कसे प्रयत्न करत आहेत, यावरील विनोद सांगून त्यांनी आमच्या चर्चेला सुरवात केली. ते टी. व्ही. पाहतात. ते मित्रांनो तुम्हालाही पाहतात. त्यांना तुम्हाला काय करायचे आहे, हे माहित आहे. तेव्हा मला वाटते बास, असे एका प्रश्‍नाला उत्तर देताना बॅनर्जी हसत हसत म्हणाले.

तत्पुर्वी मोदी यांची बॅनर्जी यांची भेट घेतली. त्याबाबत मोदी यांनी ट्विट केले. त्यांनी आम्हा दोघांत विविध विषयांवर व्यापक आणि सकस चर्चा झाली. त्यांच्या ज्ञानाचा भारताला अभिमान आहे. . नोबेल विजेते अभिजित बॅनर्जी यांच्याशी उत्तम चर्चा झाली. असे त्यात म्हटले होते. या भेटीबाबत बॅनर्जी म्हणाले, त्याची भेट होणे हे माझे भाग्य होते. पंतप्रधान कशा विचार करतात, हे माझ्यासाठी औत्सुक्‍याचे होते. पंतप्रधांनानी मला वेळ दिला. ते भारताचा कसा विचार करतात, याबाबतही ते भरभरून बोलले. कारण सहसा राजकारणाबाबत बोलले जाते, मात्र त्यापलीकडे काय विचार करतात हेही त्यांनी सांगितले.

अभिजित बॅनर्जी हे डाव्या विचारांचे असून बॅनर्जी यांचे विचार भारतीय जनतेने नाकारले आहेत, अशी टीका भाजपाचे केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी केली होती. गोयल यांच्या टीकेलाही बॅनर्जी यांनी उत्तर दिले. मंत्र्यांनी त्यांच्या व्यावसायिकतेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण केले. आम्ही अर्थशास्त्रीय विचार करताना नि:पक्ष असतो. माझ्या व्यावसायिकतेवर प्रश्‍न निर्माण करून त्यांचा काही लाभ होईल, असे मला वाटत नाही. हा पुरस्कार आम्हाला मिळालाल त्यामगे आमची व्यावसायिकता हे ही एक कारण आहे. मला कोणी प्रश्‍न विचारला तर मी त्याच्या प्रश्‍नाच्या हेतूचा विचार करत नाही, असे ते म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.